थायलंड
थायलंड : (प्राथेट थाय). आग्नेय आशियातील एक सार्वभौम देश. प्राचीन काळी भारतीय लोकांनी वसाहती केलेल्या देशांपैकी बृहत् भारतातील महत्त्वाचा देश. ६° ते २०° उ. व ९७° ते १०६° पू. यांदरम्यान असून कमाल दक्षिणोत्तर लांबी १,५०० किमी. व कमाल रूंदी ८३० किमी. आहे. क्षेत्रफळ ५,१४,००० चौ. किमी. असून देशाची एकूण लोकसंख्या ३,९९,५०,३०६ (१९७३). १९३९ पूर्वी याचे ‘सयाम’ असे नाव होते.